कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगार सुशिक्षित युवक -युवतींच्या हाताला उद्योग वाढीतून रोजगार देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच आघाडीवर राहिली आहे. जिल्हा बँक आता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गतही कर्ज पुरवठा करणार आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला. या योजनेअंतर्गत उत्पादन व सेवा या दोन क्षेत्रातील उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र सरकारने उद्योजकतेला चालना देण्यासाठी सर्व समावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महत्त्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. या कार्यक्रमांतर्गत कृषी पूरक व्यवसाय कृषी आधारित उद्योग इ वाहतूक सेवा उद्योग यामधील रोजगार आणि स्वयंरोजगारांच्या नवीन संधींचा विचार केला आहे. या योजनेअंतर्गत वित्तपुरवठा करण्यासाठी यापूर्वी सरकारी बँका, तसेच काही खाजगी क्षेत्रातील शेड्युल्ड बँकांचा समावेश होता. त्याबरोबरच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही समावेश नव्याने झालेला आहे. "योजनेची उद्दीष्टे......." ● सध्या कार्यरत असलेल्या व नवीन स्थापित होणाऱ्या वैयक्तिक उद्योगांची पत मर्यादा वाढवणे......... ● उत्पादनांच्या ब्रँडिंग व विपणनासह त्यांना संघटित पुरवठा साखळीशी जोडणे........... ●साठवणूक प्रक्रिया, सुविधा, पॅकेजिंग व विपणन अशा सामूहिक सेवा तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिकाधिक लाभ मिळवून देणे..... या योजनेमध्ये पाच ते सात वर्षाच्या मुदतीने कर्ज व खेळत्या भांडवलासह रुपये ४० लाखापर्यंत वित्त पुरवठा होणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी शहरी भागात १५ टक्के व ग्रामीण भागात २५ टक्के अनुदान मिळणार आहे. तसेच अनुसूचित जाती -जमातीसह महिला, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गासाठी शहरी भागात २५ टक्के, ग्रामीण भागात ३५ टक्के अनुदान मिळणार आहे. या बैठकीमध्ये दुसरा महत्त्वाचा निर्णयही झाला. जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांना नाबार्डच्या 'बहुउद्देशीय सेवा केंद्र' या योजनेतील गुंतवणुकीचा फायदा मिळावा म्हणून धोरणात शिथिलता केली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील जास्तीत जास्त विकास संस्थांना स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होणार आहे. यावेळी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक, आमदार राजेश पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, सुधीर देसाई, प्रा. अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील 1860 विकास संस्थांतील सर्व 1021 गटसचिव यांना विमा संरक्षण तसेच कोरोनाच्या उपचारासाठी बॅंकेच्या कर्मचा-यांना कर्मचारी कल्याण मंडळामार्फत दोन लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचा निर्णय बॅंकेच्या मा.संचालक मंडळ सदस्यांनी घेतलेला आहे. घेतलेला आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्य.सह. बॅंकेच्या मृत्यू पावलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी बॅंक पहाडासारखी उभी राहिल असा विश्वास बॅंकेचे अध्यक्ष मा.नाम.हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाग्रस्त होवून बरे झालेल्या कर्मचा-यांनाही त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च बॅंक देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ऐतिहासिक यश: बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता.. उद्दिष्ट दहा हजार कोटी ठेवींचे.. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, मार्च २०२१ पर्यंत कर्मचाऱ्यांनी सात हजार कोटी ठेवींचा टप्पा पार करावा. तसेच मार्च २०२२ पर्यंत दहा हजार कोटी ठेवींचा टप्पा पार करावा. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच सर्वांनी जोमाने आणि जिद्दीने काम करा, असेही ते म्हणाले. तसेच जीवापाड काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जोरावर ही बँक येत्या एक-दोन वर्षात देशात एक नंबर येईल, याचा मला विश्वास आहे.
कोरोनासह अपघाती मृत्यू व इतर नैसर्गिक मृत्यूसाठी कर्मचा-यांना विमासुरक्षा देणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही सहकार क्षेत्रातील पहिली बॅंक
"Kolhapur district banks actual owners are farmers..." says Hasan Mushrif
दि.30/06/2020 इ.रोजी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सन 2019-20 या हंगामातील वसुलपात्र कर्जाची उच्चांकी 90% वसुली
Honble Chairman Hassan Mushrif and Nabard Ex-Chairman launched Mobile Platform for customers.
Bank slashed rates while launching Mobile App and Website on 1st May.
Honble Chairman Hassan Mushrif and Nabard Ex-Chairman launched Mobile Platform for customers.
Honble Chairman Hassan Mushrif and Nabard Ex-Chairman launched Mobile Platform for customers.
Bank Launched Mobile Payments aband Bank Transfer for 8,00,000 customers.
KDCC Bank donated INR 2 Cr with banks employees donating INR 22 Lakh 75 thousand to CM Relief fund. One of the biggest donation from any organisation in Maharashtra.
Read MoreHuge Growth and Tremnedous Track Record is proven when yhe Chairman of the Bank, Hon'ble Namdar Hassan Mushrif Saheb, announced the progress of the financial year 2019-20, dated 03-04-2020 etc..
Even during the lockdown, KDCC wins deposits. Bank books deposits of Rs 7.85 Crs at the month of Gudhi Padwa, said Ashok Mane, executive director of the district in this exclusive interview.
Read MoreKDCC plan visions INR 6000 Cr deposit fund. Hon'ble Namdar Hasan Mushif Saheb also announced 8 per cent deposit scheme through telephonic conversation.